लखनौ : उत्तर प्रदेशाच्या ऊस विभागाने आपल्याकडून नवे पाऊल उचलत ऊस विभागातील पर्यवेक्षक ते उपविभागीय ऊस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी योजना, नियम, विकास योजना, अधिसूचना आदींबाबतच्या ज्ञानाची पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्याची तयारी केली आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊस तथा साखर विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितले की, विभागाच्यावतीने पाच टप्प्यात ही परीक्षा घेतली जाणार आहे. २५ जून ते २५ जुलै यांदरम्यान वेगवेगळ्या स्तरावर ही परीक्षा होणार आहे. विभागाच्यावतीने अशा पद्धतीच्या परीक्षेचे आयोजन राज्यात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.