हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
टांझानियाने येत्या तीन वर्षांत साखर उत्पादन दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेथील सरकारने आश्वासक पावले टाकण्यास सुरुवात केली असून, ऊस शेतासाठी जादा जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नवीन साखर कारखानेही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती टांझानियाच्या कृषी मंत्र्यांनी दिली.
सध्या टांझानियामध्ये वार्षि ३ लाख ४५ हजार टन साखर उत्पादन होते. आता २०२२ पर्यंत हे उत्पादन ८ लाख टनापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे. देशाची साखरेची वार्षिक मागणी ६ लाख ७० हजार टन आहे. त्यापैकी जवळपास २५ टक्के साखर ही औद्योगिक क्षेत्रात वापरली जाते. या संदर्भात टांझानियाचे कृषी मंत्री जफेट हसुंगा म्हणाले, ‘आम्ही टांझानियाला साखर निर्यात करणारा देश बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी ३ लाख हेक्टर जमीन स्वतंत्रपणे केवळ ऊस शेतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.’ सरकारने पूर्व टांझानियामध्ये दोन नवे साखर कारखाने सुरू करण्याची तयारी केली असून, दोन्ही कारखान्यांत मिळून जवळपास अडीच लाख टन साखर तयार होईल, अशी अपेक्षा आहे.
टांझानियातील बाखरीसा ग्रुपने २०२१ पर्यंत ३५ हजार टन ऊस उत्पादन करण्याचे टार्गेट ठेवले आहे. टांझानियाने वर्षाला ७.२ टक्के आर्थिक विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफुली यांनी नवे कारखाने उभारून निर्मितीवर भर देण्याचे धोरण आखले आहे. उत्पादन वाढीसाठी सरकार पुढच्या वर्षीपर्यंत ५ हजार मेगावॉट वीज जादा उत्पादन करणार आहे. गेल्या पाच वर्षांतील ही दुप्पट वीज निर्मिती असणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp