महाराष्ट्र : विदर्भामधून या हंगामात उच्चांकी साखर निर्यात

नागपुर : विदर्भाला पारंपरिक कापूस आणि संत्री उत्पादन विभाग म्हणून ओळखले जाते. मात्र, चालू हंगामात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उसाची शेती करण्यात आली आहे. आणि २५,००० टन साखर निर्यात करण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, विदर्भातील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूर जिल्ह्यातील उत्पादकांनी एकरी १०५ ते ११० टन उसाचे उत्पादन घेतले आहे.

केंद्रीय साइट्रस रिसर्च इंन्स्टिट्यूच्यावतीने (सीसीआरआई) आयोजित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग (एनबीएसएलयूपी) च्या सभागृहात पीपीपी तत्तावरील माध्यमातून रोगमुक्त रोप उत्पादनावर आयोजित एका कार्यशाळेत मंत्री गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शेतकऱ्यांच्या मदतीने उसावर संशोधन केले आहे. महाराष्ट्राने २०२१- २२ या हंगामात उच्चांकी १३८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. ते म्हणाले की, टिश्यू कल्चरचा वापर नियमितपणे ऊसाच्या रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात आहे. ऊसाच्या रोपांची मागणी वाढत आहे. मात्र, कारखाने मर्यादित आहेत. त्यामुळे आम्ही जे शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतात, अशांच्या चांगल्या नर्सरीची माहिती घेतली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सीसीआरआयला जागतिक मानकांच्या अनुसरुन रोपलावणीच्या उत्पादन साहित्याची मदत करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, संस्थांच्याही काही मर्यादा आहेत. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सहयोग करता येणे शक्य होईल. ते म्हणाले की, नर्सरींचे दर, त्यांची नोंदणी केली पाहिजे. त्यांचे प्रमाणिकरण करण्याची गरज आहे. गडकरी यांनी स्वच्छ इंधनाबाबतही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, आम्ही बायोईथेनॉल सादर करीत आहोत. पुढील महिन्यापासून बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, टोयोटा, सुझुकी, हुंडई आणि बजाज, टीव्हीएस, हीरो आदींच्या स्कूटर आदी सर्व वाहने १०० टक्के बायोइथेनॉलवर चालतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here