ऊस पिकावरील कीड रोखण्याच्या उपायांना यश, शेतकरी करताहेत पिकांचे रक्षण

यमुनानगर : ऊस पिकाला टॉप बोअर किडीपासून वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करण्याची गरज नाही. शेतकरी फेरोमोन सापळे लावून पिकांचे संरक्षण करत आहेत. त्याचे दोन फायदे दिसून येत आहेत. औषधांचा खर्च वाचण्यासह विषारी रसायनांनी फवारणी टाळली जात आहे. या फेरोमोन सापळ्यांच्या वापराबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी तर या पद्धतीने जवळपास १५ एकर ऊस पिकातील किडीचे रक्षण केले आहे. गेल्या दोन वर्षात टॉप बोरर किडीमुळे उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी साधारणतः २० ते ३० टक्के पिक या किडीच्या प्रभावाखाली आले होते. त्यामुळे साखर उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, टॉप बोरर व इतर किडींच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर केला जात आहे. त्यासाठी शेतकरी एका लांब काठीला प्लास्टिकचा कटोरा बांधतात. त्यामध्ये पाणी आणि तेलाचे मिश्रण टाकले जाते. फेरोमोन हे रसायन किडींकडून सोडले जाते. या फेरोमोन सापळ्यावर एक कॅप्सुल लावलेली असते. त्यातून रसायन बाहेर पडते. त्यामुळे नर कीटक याकडे आकर्षित होतो. तो या सापळ्यात अडकून मरतो. एका रात्रीत शेकडो नर मृत होत असल्याने किडीची प्रजनन प्रक्रिया आपोआप खंडित होत आहे. खड रादौरमधील दोहली गावातील शेतकरी वागीश कांबोज यांनी सांगितले की, फेरोमोन ट्रॅपचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. राज्यात अडीच लाख एकरात ऊस पिक घेतले जाते. यापैकी सर्वाधिक उत्पादन यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल, जींद, कैथल, सोनीपत, रोहतक आदी परिसरात केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here