ऊस उपायुक्तांनी जाणून घेतल्या उत्पादक शेतकऱ्यांची समस्या

बुलंदशहर : मेरठ परिक्षेत्राचे ऊस विभागाचे उपायुक्त राजेश मिश्रा यांनी जहाँगीराबाद परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांना गाटा फिडिंगबाबत वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

याबाबत लाइव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी लचोई आणि चारोरा या गावातील गटावार जमिनीबाबतची तपासणी करण्यात आली. यावेळी जमिनीच्या अभिलेखांची पडताळणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना या अनुषंगाने येत असलेल्या अडचणींबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर ऊस उपायुक्त राजेश मिश्रा यांनी चरोरा गावातील शेतकरी योगेंद्र यांच्या ऊस पिकाची पाहणी केली. यादरम्यान जिल्हा ऊस अधिकारी दिलीप कुमार, जेष्ठ ऊस अधिकारी ज्ञान प्रकाश तिवारी, ऊस पर्यवेक्षक देशराज सिंह, योगेंद्र सिंह, नगेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here