ऊस विभागात ५२ लाख रुपयांचा खत घोटाळा उघड, सुपरवायझरकडून होणार वसुली

मेरठ : युपीतील बिजनौर जिल्ह्यात ऊस विभागामध्ये ५२ लाख रुपयांचा खत घोटाळा उघड झाला आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या अहवालानंद गोदाम सुपरवायझरकडून याची वसुली केली जाणार आहे. सरकारच्या आदेशानंतर सहकारी समितींच्या खत गोदामांतील रेकॉर्डची २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीतील तपासणी करण्यात आली. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, बिजनौरमधील स्योहारा ऊस समितीच्या गोदामातील तपासणीत २०१९ मध्ये डीएपी, एनपीके, युरिया ही खते, औषधे गायब झाल्याचे आढळून आले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तपासणी पथकाने २०२० मध्ये अहवाल सादर केला होता. तांत्रिक कारणास्तवर अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका पथकाकडूनही तपासणी केली. या पथकात तत्कालीन अप्पर सांख्यिकी अधिकारी विकल भारत, धामपूरचे सचिव मनोज, लेखापाल फतेह सिंह, संजीव त्यागी, सूरज सिंह आदींचा समावेश होता. त्यांनी ३१ मे २०२२ रोजी दिलेल्या आपल्या अहवालात ५२ लाख रुपयांचा घोटाळा असल्याचे उघड केले आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदाफल, मुकरपुर, मेवा नवादा खत गोदामांमध्येही २९ लाख ८१ हजार रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. ५७४३ पोती युरिया, १९५ पोती डीएपी, ३२४ पोती एनपीके, १०३१ लिटर जैविक खते गायब झाल्याचे आढळून आले आहे. तपासणीत यामध्ये ५२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसले. उपायुक्तांनी संशयितांकडून त्याची वसुली करावी असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here