बाजपुर : ऊस विकास परिषदेच्यावतीने रजपुरा गावात आयोजित मेळाव्यात जनसंपर्क अधिकारी नीलेश कुमार यांनी उसाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत सर्व टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऊस शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद कुमार यांनी उसाच्या प्रजीती आणि अधिक उत्पादनासाठीच्या नव्या पद्धतींची माहिती दिली. ऊसावरील कीड, रोग नियंत्रण, खतांचा वापर आदींबाबत डॉ. संजय कुमार यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक महेश प्रसाद यांनी शेतकऱ्यांना ऊस विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी जनावरांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विक्रम सिंह, ओम
सिंह, उमराव सिंह यांच्या गाईंची निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात आले. मुरलीधर उपाध्याय, राजेश कुमार, खर्गसेन, प्रमोद कुमार, अनिल शर्मा, जितेंद्र शर्मा, जयपाल, कल्याण सिंह, दिनेश पांडे, लखवीर सिंह, कुलवंत सिंह आदी उपस्थित होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किच्छा ऊस विकास विभागाच्यावतीने शांतीपूर पंचायत भवन सभागृहात आत्मा योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. किच्छा साखर कारखान्याच्या डॉ. रिना नौलिया यांनी महिला स्वयंसाह्यता गटाला नर्सरी तयार करणे तसेच साखर, गूळ उत्पादनासाठीच्या प्रगत प्रजातींबाबत माहिती दिली. ऊस उत्पादक शेतकरी गणेश उपाध्याय, कीड विशेषज्ज्ञ डॉ. रवी मौर्या, डॉ. गीता शर्मा, गंगा दत्त कुनियाल, विशन सिंह कोरंगा, महिला स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा कविता तिवारी आदी उपस्थित होते.