हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
साखर उद्योगाला अवास्तव अनुदान देऊन जगातील साखरेच्या बाजारपेठेला धक्का दिल्याचा आरोप करत ब्राझीलने जागतिक व्यापार संघटनेत भारताला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. ब्राझीलने जागतिक व्यापार संघटनेला या संदर्भात सुनावणी करण्याची विनंती केली आहे.
ब्राझीलच्या कृषी आणि विदेश मंत्रालयाच्या निवेदनासोबतच ऑस्ट्रेलियानेही अशीच विनंती करणारा अर्ज जागतिक व्यापार संघटनेकडे केला आहे. ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही साखर निर्यातदार देश एकत्र येऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतात मोठ्या प्रमाणावर साखर निर्यातीसाठी अनुदान दिल्यामुळे जगात साखरेचा पुरवठा वाढला आहे. त्याचा व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे, असा आरोप ब्राझीलकडून करण्यात येत आहे. भारताने साखरेचा पुरवठा वाढवल्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर सुमारे २५.५ टक्क्यांनी घसरल्याचा दावा ब्राझील सरकार करत आहे. यामुळे एकट्या ब्राझीलच्या साखर निर्यात क्षेत्राला जवळपास १३० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे, असेही ब्राझीलने म्हटले आहे.
भारतातील साखर उत्पादन गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या वाढले आहे. जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश म्हणून यापूर्वी ब्राझीलचे नाव होते. ते स्थान आता भारत हिसकावून घेणार आहे. भारतात साखर निर्यातीला पाठिंबा देण्यात येत असल्यामुळे गेल्या तीन वर्षांत भारत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात करेल, असे मत एका वृत्तसंस्थेने ऑक्टोबरमध्येच व्यक्त केले होते.
दरम्यान, जागतिक व्यापार संघटनेच्या कायद्यानुसार जर, एखाद्याच विषयावरील चर्चेतून किंवा सनावणीतून ६० दिवसांत मार्ग निघाला नाही तर, संबंधित पॅनेलकडून तक्रार रद्द केली जाते.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp