नायजेरियातील साखर उद्योगाला National Sugar Institute करणार मदत

मेसर्स सुनती गोल्डन शुगर एस्टेट, नायजेरियाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी सहा आठवड्याचा रिफ्रेशर कोर्सला आजपासून नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI) संस्थेमध्ये सुरुवात करण्यात आली. या ऑनलाइन अभ्यासक्रमात ३० हून अधिक इंजिनीअर, तंत्रज्ञ आणि इतर तांत्रिक कर्मचारी सहभागी होत आहेत.

नायजेरिया हा साखरेची कमतरता असणारा देश आहे. तो आयातीच्या माध्यमातून आपली देशांतर्गत साखरेची ९५ टक्के गरज भागवतो. नायजेरीयात जवळपास १७ लाक मेट्रिक टन साखरेची आयात केली जाते. ही आयात मुख्यत्वे ब्राझीलकडून होते. सप्टेंबर २०१२ मध्ये नायजेरिया सरकारने कमीत कमी कालावधीत स्थानिक साखर उत्पादनात स्वावलंबन करण्यासाठी राष्ट्रीय शुगर डेव्हलपमेंट कौन्सिलकडून (NSDC) विकसित एका रोड-मॅप, धोरणाच्या रुपात नायजेरिया शुगर मास्टर प्लान (NSMP) तयार केला. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नायजेरीया ऊस आणि साखर उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे देशातील साखर उत्पादन यंत्रांची दक्षता तसेच त्यांच्या संचालनासाठी योग्य प्रयत्नांची गरज आहे.

आम्ही नायजेरियन सरकारला पात्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी, प्राध्यापक प्रशिक्षणासह एक शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यास आधीच मदत केली आहे. मात्र, अद्याप खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या अंतर्गतच नायजेरीयामधील साखर कारखाने आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे पाठबळ मागत होते. कारखान्यांतील यंत्रयामुग्री योग्य काळजी घेऊन चालवली गेली पाहिजेत, असे संचालक नरेंद्र मोहन यांनी सांगितले. ते म्हणाले, कमी खर्चात चांगल्या प्रतीची साखर तयार करण्यासाठी आम्ही त्यांना उपलब्ध उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि मानक कार्यपद्धतीचे ज्ञान देणार आहोत. संस्थेच्या प्राध्यापकांच्यावतीनेही साखरेची सुरक्षित प्रक्रिया आणि पॅकेजिंगबाबत माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षणादरम्यान, सहभागींना प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या अत्याधुनिक यंत्रसामग्री, स्टीम, वीज आणि रसायनांचा वापर कमी करण्यासाठीचे उपायदेखील सांगितले जातील. आम्ही त्यांना मूल्यवर्धित उत्पादनांच्या उत्पादनासाठी उप-उत्पादनांच्या वापराच्या अलीकडील ट्रेंडबद्दलदेखील अवगत करू असे शुगर इंजिनीअरिंग आणि अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. डी. स्वेन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here