कीड, रोगांपासून उसाच्या बचावासाठी शास्त्रज्ञांनी केले मार्गदर्शन

बस्ती : ऊस शेती ही शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभदायक आणि सुरक्षित आहे. हवामानाचा विपरीत परिणाम झाला तरी शेतकऱ्यांना त्यांचा नफा काही अंशी हमखास मिळतो. त्यामुळे या पिकाची शेतीसाठी शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उसावरील कीड, रोगांच्या बचावासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अशा विचारातून मुंडेरवा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सेवरही ऊस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किटक विशेषज्ज्ञ  विनय कुमार मिश्र आणि डॉ. वाय. पी. मिश्र यांनी दीक्षापार येथे शेतकरी अजय शुल्क यांच्या ऊस पिकाची पाहणी केली. मसौना येथे रामचंद्र यांचे ऊस पिकही पाहिले. लहुरादेव येथे वीरेंद्र मौर्य याच्या उसाची तसेच सरौली गावात त्रिभुवन पांडे, कोरऊ गावातील शेतकरी नंदलाल चौधरी, अशरफपूरमध्ये शेतकरी इंद्रदेव यादव यांच्य उसाची पाहणी करण्यात आली. त्यांना रोगांपासून आपला ऊस कसा लांब ठेवता येईल याची माहिती दिली. यावेळी मेळावा झाला. यामध्ये शेतकरी सहभागी झाले. ऊस व्यवस्थापक आर. डी. विश्वकर्मा, एलएसएसचे डीजीएम ओ. पी. पांडे, ऊस उपव्यवस्थापक एन. पी. सिंग, सहाय्यक ऊस व्यवस्थापक के. एम. पांडे, एस. एन. राय आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here