बिहारमध्ये भारताची सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी करणार ५०० कोटींची गुंतवणूक

पाटणा : जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये सहभागी असलेल्या भारताची सर्वात मोठी कंपनी हिंदूस्थान युनिलिव्हर बिहारमध्ये गुंतवणूक करणार आहे. बिहार राज्याला आता बड्या कंपन्यांसोबत बहुराष्ट्रीय कंपन्यांची पसंती मिळू लागली आहे. हिंदूस्थान युनिलिव्हरने जवळपास ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांनी सातत्याने बिहारच्या उद्योगांच्या स्थापनेसाठी प्रयत्न चालवले आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये बिहारमधील गुंतवणुकीसाठी केंवेंटर्स अॅग्रोने ६०० कोटी आणि जेआयएस ग्रुपने ३०० कोटींचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी आयटीसी, पेप्सीसारख्या कंपन्यांनीही राज्यात गुंतवणूक केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्‍तान युनिलिव्हर (एचयूएल) सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून बिहारमध्ये गुंतवणुकीसाठी जमिनीचा शोध सुरू आहे. कंपनीने मुजफ्फरनगरमधील मोतीपूर साखर कारखाना आणि इतर औद्योगिक क्षेत्रांचा दौरा केला. उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी दिल्लीत आयोजित इन्व्हेस्टर्स समिटमध्ये एचयूएलने बिहारमध्ये गुंतवणुकीत रस दाखवला होता. सध्या आयटीसी बिहारमध्ये काम करीत असून कंपनीने विस्ताराची तयारी सुरू केली आहे. ब्रिटानिया कंपनीने राज्य सरकारकडून जमीन घेतली असून ही कंपनी ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. बियाडाने ब्रिटानियाला सिकंदरपूरच्या औद्योगिक क्षेत्रात कंपनीसाठी १५ एकर जमीन दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here