रसायनमुक्त गुळाच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांचा सेंद्रिय ऊसाकडे कल

म्हैसूर : जिल्ह्यात रसायनमुक्त गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथे सेंद्रिय ऊसाचे प्रमाणही वाढत आहे. म्हैसूर जिल्ह्यात १७,१३० हेक्टर आणि चामराजनगर जिल्ह्यात ७,१२७ हेक्टरवर ऊसाची लागवड केली जाते. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, दोन्ही जिल्ह्यांतील ऊस लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी १ ते २ टक्के हिस्सा सेंद्रिय ऊस लागवडीचा आहे.
उत्पादकांच्या मते स्थानिक पातळीवर उपलब्ध कॅल्शियमयुक्त चुनखडी आणि इतर सेंद्रिय उत्पादने वापरत असल्याने सेंद्रिय गुळाचा उत्पादन खर्चही खूपच कमी आहे. त्यांनी सांगितले  की, पांढऱ्या गूळ उत्पादनात कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट इतर रसायनांसह गुळावर प्रक्रिया करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि पॉलिश करण्यासाठी वापरतात. राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुरूर शांताकुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने उत्पादकांना प्रोत्साहन जाहीर करून सेंद्रिय ऊस लागवड करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here