उत्तर प्रदेश: ऊस उत्पादनात शामली जिल्हा राज्यात अव्वल

शामली : शामलीतील तीन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी वेळेवर न देऊनसुद्धा  पुन्हा एकदा जिल्हा ऊस उत्पादनात सर्वोत्तम ठरला आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील ऊस आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, शामलीने यावर्षी सरासरी १,०१४.१ क्विंटल प्रती हेक्टर पीक उत्पादन नोंदवले आहे.  तर मुझफ्फरनगर दुसऱ्या आणि मेरठ तिसऱ्या स्थानावर आहे.
जिल्हा ऊस अधिकारी (डीसीओ) विजय बहादूर सिंह यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, उत्पादकतेमध्ये 1 हेक्टर जमिनीवर पिकवलेल्या ऊसाचा समावेश होतो. जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र २०२१-२२ मध्ये ७७,२४७ हेक्टर होते, तर २०२२-२३ मध्ये ते ७९,८०१ हेक्टर इतके वाढले आहे. ऊस उत्पादनात शामलीने उत्तर प्रदेशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून हे सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे.
तथापि, शेतकर्‍यांच्या ऊस बिलाचा विचार करता, शामलीतील तीन साखर कारखान्यांनी १,१५१.६ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या तुलनेत केवळ ४२८.३ कोटी रुपये दिले आहेत. मागील गळीत हंगाम २०२१-२२ पर्यंत ७२३.२६ कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती.
पिकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी खूप जागरूक आहेत. ऊस हे एक असे पीक आहे ज्याचे जोखीम कवच जास्त असते आणि शेतकऱ्यांना निश्चित किंमतही मिळते. यामुळे पैसे मिळण्यास विलंब होऊनही शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here