कलबुर्गी : Karnataka Rajya Raita Sangha (KRRS) च्या कार्यकर्त्यांकडून सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत. सरकारने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस थकबाकी त्वरीत देण्याचे निर्देश द्यावेत आणि ऊस दर प्रती टन ४५०० रुपये करावा अशा मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
कर्नाटक राज्य रयत संघाचे (केआरआरएस) जिल्हाध्यक्ष नागेंद्र तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात कारवाई करण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. साखर कारखाने ऊसाच्या एफआरपीपेक्षा कमी दरा ऊस खरेदी करत आहे, असा त्यांनी आरोप केला. तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची सूचना करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्वरीत ऊस बिले देण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.