केप टाऊन : उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पाहिले तर दक्षिण आफ्रिकेतील कृषी क्षेत्र सामान्यपणे सकारात्मक वाढ दर्शवित आहे. २०२० मध्ये या क्षेत्रात वार्षिक १३.४ टक्के वाढ झाली आणि २०२१ साठीचे पूर्वानुमानही खूप चांगले आहे. कोरोना महामारी नंतर प्राथमिक कृषी रोजगार अपेक्षेप्रमाणे स्थिर राहिला. यामध्ये २०२१ च्या चौथ्या तिमाहीत ८,६८,००० लोक कार्यरत आहेत. आणि २०२१ मधील निर्यातही १२.४ बिलियन अमेरिकन डॉलरच्या उच्चांकी स्तरापर्यंत पोहोचली आहे. अशा सकारात्मक स्थितीनंतरही साखर उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य संवर्धन लेव्ही (शुगर टॅक्स) चा उद्देश मधुमेह आणि लठ्ठपणाचा वाढता स्तर कमी करण्याचा आहे. साखर उद्योग खरोखरच दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा उद्योग आहे. मात्र, या उद्योगावर लागू करण्यात आलेला शुगर टॅक्स देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर सर्वाधिक करांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचा साखर उद्योग जागतिक साखर उद्योगाशी स्पर्धा करीत आहेत. स्थानिक आव्हानेही त्याच्यासमोर उभी राहिली आहेत. इतर साखर निर्यातदारांच्या तुलनेत उत्पादनाचा अधिक खर्च, बिघडती पायाभूत सुविधा, साखर डंपिंग, लेव्ही अशा घटकांनी साखर उद्योगावर नकारात्मक प्रभाव टाकला आहे. साऊस आफ्रिका शुगर असोसिएशनकडील आकडेवारीनुसार, २००५-०६ आणि २०१८-१९ या उत्पादन हंगामादरम्यान साखर उत्पादनात किमान १२.७ टक्के घसरण झाली आहे. कमी देशांतर्गत उत्पादन, वाढता उत्पादन खर्च, स्वस्त साखर आयात या कारणांमुळे हळूहळू उत्पादनात घसरण दिसून येत आहे.