सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयात ७ पैशांची घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील जोखीम घेण्यापासून बचावाच्या ट्रेंडमुळे सोमवारी सुरुवातीच्या सत्रामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सात पैशांनी घसरुन ७९.३३ वर आला. रुपया आधीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत ७९.२६ या आपल्या सर्वात निच्चांकी स्तरावर बंद झाला होता. इंटरबँक फॉरेन करन्सी बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत स्थितीत ७९.३० वर खुला झाला. त्यानंतर तो ७९.३३ वर ट्रेड करीत होता. आधीच्या बाजार सत्राच्या तुलनेत सात पैशांनी कमजोर स्थितीत ट्रेड करीत होता. सुरुवातीच्या या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७९. २४ आणि ७९.३५ या दरम्यान ट्रेड करीत राहिला.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीमुळे कमजोर रुपया सावरण्यास मदत मिळाली. प्रमुख सहा करन्सीच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांत ०.३१ टक्क्यांनी वाढून १०७.३४ वर पोहोचला. ग्लोबल बेंचमार्क क्रूड वायदा ०.६३ टक्के घसरुन १०६.३५ डॉलर प्रती बॅरलवर होता. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी शुक्रवारी १०९.३१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. आज सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स २३३.२४ अंक म्हणजेच ०.४३ टक्के घसरुन ५४,२४८ वर खुला झाला. आणि निफ्टी ८४.४५ अंक म्हणजेच ०.५२ टक्के घसरुन १६,१३६ वर ट्रेड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here