हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
देशांतर्गत बाजारपेठेतील साखर विक्रीचा कोटा १६.६७ टक्क्यांनी वाढवून महिन्याला २४.५० लाख टन करण्यात आला आहे. मार्च महिन्यासाठी हा वाढीव कोटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये साखर विक्री करण्याविषयी चिंता वाढली आहे. तर, साखर निर्यातदार अजूनही कारखाने साखर निर्यात करतील, अशी आशा बाळगून आहेत. दरम्यान, साखर कारखान्यांना थेट बाजारपेठेतही साखर विक्री करणे शक्य आहे, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात साखर उद्योगातील तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकारने नुकतीच साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केली आहे. त्याच फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. साखरेची मागणीच खूप कमी असल्याने बाजारपेठ थंड आहे. त्यामुळे साखरेचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे बँकांच्या कर्जाचे हप्ते आणि व्याज कारखान्यांना भरावे लागत आहे. या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या एकूण ऊस बिल थकबाकीवर होताना दिसत आहे.
या संदर्भात ChiniMandi.com शी बोलताना महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले ‘बाजारात साखरेला मागणीच नाही. कारखाने व्यापाऱ्यांना साखर विक्री करत आहेत. त्यांना थेट बाजारातही साखर विक्री करणे शक्य आहे. त्यातून त्यांना अधिक चांगली रक्कम मिळू शकेल. यामुळे आताच्या घडीला साखर कारखान्यांना ज्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातून त्यांना बाहेर पडणे शक्य होणार आहे.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp