नवी दिल्ली : मान्सूनच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र आणि गुजरासह देशातील अनेक राज्यांत धुँवाधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांमध्ये पुरासारखी स्थिती आहे. तर अनेक ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. गुजरातमध्ये पावसाच्या विद्ध्वंसामुळे आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणांतून औरंगाबादच्या जायकवडी धरणात ७८.३९९ क्सुसेक प्रती सेकंद पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत याचा जलस्तर ३४.६९ टक्के होता. आता तो ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक आणि अहमदनगरमधून गोदावरी नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे वैजापूर आणि गंगापूरमध्ये अनेक गावांना जिल्हा प्रशासनाने हाय अलर्टवर ठेवले आहे. यांदरम्यान हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवारी वर्धा जिल्ह्यातील एक कच्चा बंधारा तुटल्याने तीन गावांत पाणी घुसले. दक्षिण गुजरात आणि कच्छ सौराष्ट्रमध्ये गेल्या २४ तासात पुराच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३१००० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, पावसामुळे कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे नुकसान झाले आहे. उत्तराखंडमध्येही अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. त्यामुळे डेहराडून, पौडी, चंपावत, नैनिताल, उधम सिंह नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.