बस्ती : विभागातील गोविंदनगर साखर कारखान्यातून १२ व्होल्टच्या ३२ बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या उप जिल्हाधिकारी शैलेश दुबे यांनी या चोरीच्या प्रकाराची माहिती घेतली आहे. थकीत वेतन, कारखाना चालविण्याची मागणी, शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले यामुळे कारखान्यात कामगारांचे दीर्घ काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. गटवर धरणे आंदोलन देणाऱ्या कामगारांना कारखान्यातील बॅटरी चोरी प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर एका कामगाराने उप जिल्हाधिकाऱ्यांना या चोरी प्रकरणाची माहिती दिली.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, घटनास्थळी आलेल्या उप जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ३२ बॅटऱ्या गायब झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रमुख योगेश सिंह हेही कारखान्यात आले. घटनेबाबत लोकांकडे चौकशी करण्यात आली. यापूर्वीही अशा प्रकारे कारखान्यात चोरीचे प्रकार घडले आहेत, असे कामगारांनी सांगितले. उप जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी दहा वाजता चोरीच्या घटनेची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी स्थानिकांकडून याची माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख योगेश सिंह यांनी संगितले. तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंदवला जाणार आहे.