साओ पाउलो : ब्राझीलमधील सर्वात मोठे जैव इंधन उत्पादक BSBios कडून ब्राझीलमध्ये पहिल्या, गव्हापासून इथेनॉल निर्मिती प्लांटची उभारणी केली जात आहे. युरोप आणि कॅनडामध्ये गव्हावर आधारित इथेनॉल प्लांट आहेत. मात्र, ब्राझीलमध्ये बहुतांश उत्पादन ऊस आणि मक्क्यापासून केले जाते.
BSBios चे CEO Erasmo Battistella यांनी एका मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले की, शेतकरी गहू उत्पादन क्षेत्राचा विस्तार करतील. यातून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि धान्यासाठी एक मोठी बाजारपेठ विकसित होईल. ब्राझीलमध्ये यंदा उच्चांकी ९ मिलियन टन पिक उत्पादन होईल अशी शक्यता आहे. उत्पादकांनी गेल्या ३२ वर्षात एवढ्या मोठ्या विक्रमी पिकाची पेरणी केली आहे.
ब्राझीलच्या सर्वात दक्षिणेकडील राज्य आणि देशातील सर्वात मोठ्या गहू उत्पादक रियो ग्रांडे डो सूलमध्ये २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत BSBios चा गहू इथेनॉल प्लांट सुरू होईल. कृषी संशोधन संस्था एम्ब्रापाने दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमधील गव्हाचे उत्पादन १९७० नंतर पाच पटींनी वाढून प्रती हेक्टर ३,००० किलो झाले आहे. याशिवाय, ब्राझीलने अलिकडेच अर्जेंटिनासोबत भागिदारीत सेराडोमध्ये विविध प्रकारच्या गव्हाच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.