केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४७ व्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्याची अंमलबजावणी १८ जुलै २०२२ पासून होणार आहे.
गूळ आणि खांडसरी शुगरवर आता ५ टक्के जीएसटी आकारणी होणार आहे. अधिसूचनेनुसार, सर्व प्रकारच्या गुळावर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये Cane Jaggery (Gur), Palmyra Jaggery याचाही समावेश आहे. पॅकबंद, लेबल गूळ आणि खांडसरी शुगरवर ५ टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी १८ जुलै २०२२ पासून होईल.
उद्योगातील जाणकार सुनील शाह यांनी चीनीमंडीसोबत बोलताना जीएसटी लागू केल्याबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले, गूळ उद्योग आधीच अडचणीच्या स्थितीत आहे. या निर्णयामुळे उद्योगासमोरील अडचणी वाढतील. याचा परिणाम खांडसरी शुगर उद्योगावरही होईल. साखर कारखान्यांसाठी व्हॅक्यूम पेनची प्रक्रिया आहे तर खांडसरी शुगरसाठी ओपन पेनची प्रक्रिया असल्याने याची रिकव्हरी कमी असते. रिकव्हरी कमी असल्यानंतरही ५ टक्के जीएसटी खांडसरी शुगर उद्योगाच्या अडचणीत वाढ होणार आहेत.