कोलंबो : राजधानी कोलंबोमधील सुपर मार्केटमध्ये भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा साठा गतीने संपत आहे. साखरेसह स्वयंपाकाचे तेल, घरगुती गॅस, पेट्रोल, दूध पावडर, औषधे अशा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांना रांगा लावाल्या लागत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, २.३ मिलियन मुलांसह ५.७ मिलियन श्रीलंकन लोकांना आता तत्काळ मानवी सहाय्याची गरज आहे. कोलंबोतील सुपर मार्केटमध्ये निम्मे रॅक रिकामे आहेत. अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू, खास करुन अंडी, ब्रेड यांचा कमी पुरवठा होत आहे. कारण जेवण आणि वाहतूक खर्च गतीने वाढला आहे.
श्रीलंकेत साखरेचे संकट वाढताना दिसून येत आहे. श्रीलंका आपल्या गरजेपोटी साखर आयातीवर अवलंबून राहतो. सद्यस्थितीत आर्थिक टंचाईमुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे.