मुंबई : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात काही पूरग्रस्त भागात स्थिती गंभीर बनली आहे. या विभागातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतच्या विभागीय हवामानशास्त्र केंद्राने सोमवारी गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सोमवारी सांगितले आहे की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुराची स्थिती आहे. जोरदार पावसामुळे नद्यांना उधाण आले आहे. राज्यात एक जूनपासून आतापर्यंत पावसाशी संबंधीत घटनांमुळे मृतांची संख्या १०५ झाली आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रत्नागिरी आणि गडचिरोलीत पुरासारखी स्थिती आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, वर्धा आणि गढचिरोलीत नद्यांच्या उधाणामुळे पुरासारखी स्थिती आहे. रविवारी एनडीआरएफच्या जवानांनी गडचिरोलीतील पूरग्रस्त भागात मदतकार्य केले. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. राज्यात पुरामुळे आतापर्यंत १०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८९ जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ११,८३६ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. शनिवारी दोघा जणांचा मृत्यू झाला. तर ६८ जण जखमी झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू असून १३ एनडीआरएफ आणि तीन एसडीआरएफ तुकड्या तैनात आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगावसह राज्यात पावसाचा २८ जिल्ह्यांना फटका बसला आहे.