मुंबई : महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस सुरू राहील. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ जुलै रोजी राज्यात जोरदार पाऊस कोसळू शकतो. हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवार ते रविवार या काळात राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातपाऊस कोसळेल. मात्र, कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पाकिस्तान आणि त्यालगच्या परिसरात पश्चिमी चक्रीवादळामुळे पाऊस कोसळेल. महाराष्ट्रात एक जूनपासून आतापर्यंत पावसामुळे १०५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेचा गुणवत्ता सूचकांक चांगला ते समाधानकारक स्थितीत आहे. मुंबईत कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २२ असेल. तर पुण्यात किमाल तापमान ३० आणि किमान तापमान २२ राहील.