जकार्ता : कृषी मंत्री सयाहरुल यासीन लिम्पो आणि उद्योग मंत्री एरिक थोहिर यांना देशातील गरजांची पूर्तता करण्यासाठी देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढविण्याचे निर्देश राष्ट्रपती Joko Widodo (Jokowi) यांनी दिले आहेत. इंडोनेशियातील साखरेची घरगुती मागणी ३.२ मिलियन टन आणि औद्योगिक साखर वापर ४.१ मिलियन टनावर पोहोचली आहे. तर देशात केवळ २.३५ मिलियन टन साखर उत्पादन झाले आहे.
साखर उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी राष्ट्रपती जोको विडोडो (जोकोवी) यांनी आदेश दिला आहे. कृषी मंत्री सयाहरुल यासीन लिम्पो यांनी टिप्पणी केली आहे की, राष्ट्रपतींनी आम्हाला साखर उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्हाला देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जवळपास ८५० हजार टन अतिरिक्त साखर उत्पादन करण्याची गरज आहे. लिम्पो यांनी सांगितले की, राष्ट्रपती अन्नधान्य भांडार आणि उपलब्धता, खास करून साखरेच्या मुद्यांवर कडक लक्ष ठेवचतील. कारण, साखरेमुळे राष्ट्रीय महागाईच्या स्तरावर परिणाम होत आहे. जून २०२२ पर्यंत इंडोनेशियाचा वार्षिक महागाईचा दर ४.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.