भारताकडून साखर निर्यात परवानगीमुळे भुतानला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भुतानच्या ११ उद्योगांमध्ये कच्च्या मालाच्या रुपात साखरेची आवश्यकता असते. ते आता साखर आयात करू शकतील. त्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत १०,००० मेट्रिक टन (MT) साखरेची गरज भासेल. भारत सरकारने भुतानच्या विनंतीनंतर १९ जुलै रोजी खास अनुमती दिली आहे. भारताच्या या निर्णयाने भुतानला मोठा दिलासा मिळाला आहे. आणि भुतान सरकारने भारताला धन्यवाद दिले आहेत.

भारताच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखर निर्यातीस बंदी घातली आहे. मात्र, साखर संचालयाकडून साखरेच्या निर्यातीला खास अनुमती दिली जाईल असेही नमुद करण्यात आले होते. या आयात निर्बंधानंतर अन्न, कृषी, शीतपेय उद्योगांनी सरकारला Association of Bhutanese Industries (ABI) च्या माध्यमातून भारताने साखर आयात बंद केली तर कारखाने बंद पडतील असे कळवले होते. या दरम्यान १९ जुलै रोजी भारताकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये भुतानला दिलेली खास अनुमती वगळता जून महिन्यात जारी केलेले इतर निर्बंध जैसे थे राहतील असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here