बस्ती : आागामी गळीत हंगामात बभनान साखर कारखाना प्रती दिन २० हजार क्विंटल अतिरिक्त ऊस गाळप करेल. कारखाना आतापर्यंत प्रती दिन ८० हजार क्विंटल प्रती दिन ऊसाचे गाळप करत होते. आता गाळप क्षमता वाढवून एक लाख क्विंटल प्रती दिन करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस कारखाना वेळेवर विकत घेऊ शकेल. गुरुवारी १३० कोोटी रुपये खर्चाच्या या नव्या प्लांटचे मुख्य महा व्यवस्थापक अजय कुमार दुबे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून फाऊंडेशनवर मशिनरी बसविण्याचे काम सुरू झाले.
जागरणनध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नव्या प्लांटमुळे साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे असे मुख्य महाव्यवस्थापकांनी सांगितले. अत्याधुनिक मशीनमुळे चांगल्या प्रतीच्या साखरेचे उत्पादन होईल. नव्या प्लांटच्या स्थापनेचे काम गतीने सुरू आहे. ते वेळेवर पूर्ण केले जाईल. साखर कारखाना यंदाही वेळेवर सुरू होईल. शेतकरी वेळेवर ऊस कारखान्याला पाठवून गव्हाची पेरणी करू शकतील. यापूर्वी त्यांना यामध्ये अशा अडचणी येत होत्या. त्या दूर होतील.