डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये शानदार वाढ, ७९.२६ वर झाला बंद

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये शानदार वाढ पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ५० पैशांनी मजबूत होवून ७९.२६च्या स्तरावर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत सकाळी रुपया मजबूतीने खुला झाला होता. सकाळी तो डॉलरच्या तुलनेत ७९.७६च्या तुलनेत ७९.५३च्या स्तरावर खुला झाला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाची शानदार सुरुवात दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैसे वाढून खुला झाला. सकाळी ९.५५ च्या आसपास रुपया ७९.३९च्या स्तरावर ट्रेड करताना दिसला. गुरुवारी तो डॉलरच्या तुलनेत ७९.७६ च्या स्तरावर बंद झाला होता. ऑगस्ट सिरीजच्या सुरुवातीला ग्लोबल मार्केटने चांगले संकेत दिले आहेत.

हिंदी मनी कंट्रोल डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, यादरम्यान, इक्विटी बाजारावर नजर टाकली तर मार्केटची शानदार सुरुवात दिसून येते. ऑगस्ट सीरीजमध्ये निफ्टी १७.००० वर खुला झाला. सेन्सेक्स, निफ्टीत १ टक्क्याहून अधिकची तेजी दिसली. सेंसेक्समधील २८ शेअर्समध्ये तेजी होती. तर निफ्टीत ती ४६ शेअर्समध्ये दिसली. बँक निफ्टीत ११ शेअर तेजीत होते. २८ जुलैच्या ट्रेडमध्ये एफआयआयने भारतीय इक्विटी बाजारातून १६३७..६९ कोटी रुपयांची खरेदी केली. तर देशांतर्गत खरेदीदारांनी ६००.२९ कोटींची खरेदी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here