मनीला : फिलीपाईन्स सध्या साखरेच्या तुटवड्याचा सामना करीत आहे. मात्र, देशात पुरेसा साखर पुरवठा होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. त्याअंतर्गत कृषी विभाग (डीए) साखरेच्या कृत्रिम टंचाई अथवा हेराफेरीच्या आरोपांची पाहणी करेल. कारण साखरेच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे, ग्राहक आणि राजकीय घडामोडी विभागाचे अव्वर सचिव क्रिस्टीन इवेंजेलिस्टा यांनी सांगितले की, आम्हाला साखरेच्या कृत्रीम टंचाईच्या तक्रारी मिळाल्या आहेत आणि त्यावर लक्ष दिले जात आहे. इवेंजेलिस्टा यांनी असे सांगितले की, ते नफेखोरी अथवा हेराफेरीच्या तक्रारींची पडताळणी करीत आहेत, ज्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत, त्यातून जर त्या खऱ्या असल्याचे सिद्ध झाल्यास डीएकडून आवश्यक ती पावले उचलली जातील. इवेंजेलिस्टा म्हणाले की, डीए कडून साखरेच्या किमतीच्या खर्चाच्या संरचनेचा आढावाही घेतला जाईल.
इवेंजेलिस्टा म्हणाले की, जर साखरेच्या किंमत वाढीच्या समस्येमागे पुरवठा कारणीभूत असेल तर ही समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू. सुपरमार्केटमध्ये कच्च्या साखरेची किंमत P५४.२० से P८२ प्रती किलोपर्यंत आहे. तर घाऊक बाजारात ती P६५ से P७० प्रती किलो दराने विक्री केली जाते. फिलिपाईन्समधील साखर साठा ऑगस्टपर्यंत पुरेल असे संकेत एसआरएने दिले होते.