पिलीभीत : राज्याचे ऊस विकास तथा साखर कारखाना राज्यमंत्री संजय सिंह गंगवार यांनी बंद पडलेला मझोला सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने त्यांनी डेरहाडूनमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. यावेळी राज्यामंत्र्यांनी मझोला साखर कारखान्याच्या उत्तराखंडशी असलेल्या संबंधाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे मदत मागितली. ऊस विकास तथा साखर कारखाना राज्यमंत्र्यांनी मझोला साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आहे. हा त्यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र उत्तराखंडच्या सीमेवरील मझोला विभागातील ११ गावे आहे. या गावांतून कारखान्याला पुन्हा ऊस पुरवठा होऊ शकतो.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तराखंडमधील १११ गावे तथा पिलीभीतमधील ५१ गावांचा समावेश आहे. मझोला साखर कारखाना हा उत्तराखंड आणि युपीच्या विभागानंतर जवळपास १२ वर्षांपूर्वी, २००९-१० मध्ये पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने बंद पडला होता. उत्तराखंडचे विभाजन हे याचे कारम होते. कारखान्यालगतच्या उत्तराखंडमधील १११ गावांनी ऊस पुरवठा बंद केला होता. राज्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत शुगर फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. कारखाना सुरू होण्यातील अडथळे हळूहळू दूर केले जात असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळातही कारखाना सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.