मुंबई : देशाचा परकीय चलनसाठा २२ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५२ अब्ज डॉलरने घसरुन ५७१.५६ अब्ज डॉलरवर आला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील सततच्या चढ उतारामुळे परकीय चलनाचा साठा कमी झाला आहे. सलग चौथ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, याआधी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ७.५४१ अब्ज डॉलरने घसरून ५७२.७१२ अब्ज झाला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृततानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता (FCA) अहवालाच्या आठवड्यात १.४२६ अब्ज डॉलरने घट होवून ती ५१०.१३६ अब्ज डॉलर झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सोन्याच्या साठ्याचे मूल्यही या आठवड्यात १४५ दशलक्ष डॉलरने वाढून ३८.५०२ अब्ज डॉलर झाले आहे. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये ठेवलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये युरो, पाऊंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमध्ये होणारे मूल्यवृद्धी किंवा अवमूल्यन यांचा समावेश होतो.