कर्नाटक : तीन नव्या इथेनॉल प्लांटला मंजुरी

बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चस्तरीय मंजूरी समितीने (एसएचएलसीसी) शुक्रवारी ३४,४३२ कोटी रुपयांच्या १८ गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामधील आठ नव्या योजना आहेत. तर १० योजनांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रचंड गुंतवणुकीमधून ४८,८५० रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या गुंतवणूक प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव इथेनॉल योजनांशी संबंधीत आहेत.

यामध्ये Trualt Bioenergy Ltd-Ethanol Plant च्या २००० किलो-लिटर प्रती दिन क्षमतेच्या इथेनॉल प्लांटमध्ये १५७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. श्री रेणुका शुगर्सच्या डिस्टिलरी / इथेनॉल प्लांट (७७५ कोटी रुपये) आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याची डिस्टिलरी/इथेनॉल प्लांटलाही (२७० कोटी रुपये) राज्य सरकारने मंजुरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here