सरकारचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम भारतासाठी ठरणार गेमचेंजर

मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी इंडियन ऑल मार्केटिंग कंपनी आणि प्रमुख एकीकृत ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत पेट्रोलियमने विश्व जैव इंधन दिवसाच्या निमित्ताने जैव इंधनाचे धोरणात्मक महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट केले. पारंपरिक जीवाश्म इंधनाच्या पर्यायाच्या रुपात गैर जीवाश्म इंधनाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर रुडॉल्फ क्रिश्चियन कार्ल डिझेल (डिझेल इंजिनचे जनक) यांच्याकडून शोधलेल्या प्रयोगाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. सर रुडॉल्फ क्रिश्चियन कार्ल डिझेल यांनी १८९३ मध्ये शेंगदाणा तेलासोबत इंजिन चालवले होते.

ई २० कार्यक्रमातून दरवर्षी १ बिलियन अमेरिकन डॉलरची बचत
भारतात जैव इंधन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा, आयातीमध्ये घट, रोजगार निर्मिती, स्वच्छ पर्यावरण, आरोग्य लाभ आदींमध्ये मदत करेल. स्थानिक लोकसंख्येसाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी कोरडवाहू जमिनीचा वापर करून विद्यमान जैवविविधतेचा योग्य वापर केला जाऊ शकतो. २०२०-२१ मध्ये ५५१ बिलियन अमेरिकन डॉलर खर्चून भारताने पेट्रोलियमची शुद्ध आयात १८ MT केली होती. बहुतांश पेट्रोलियम उत्पदनांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे ई २० कार्यक्रम यशस्वी झाल्यास दरवर्षी १ बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ३०,००० कोटी रुपये वाचू शकतात.

ई २० एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक गरज
यावेळी बोलताना बीपीसीएलचे कार्यकारी संचालक (रिटेल) पी. एस. रवी म्हणाले की, बीपीसीएल उद्योगामध्ये इथेनॉलसाठी समन्वयक आणि लिडर आहे. आम्ही सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाला ऊर्जा सुरक्षा मिळविणे, एक परिपूर्ण निम्न कार्बन अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करणे महत्त्वाचे आहे. पी. एस. रवी म्हणाले की, पेट्रोल सोबत स्थानिक रुपयात उत्पादित इथेनॉलचे मिश्रण भारताला आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे, आयात कमी करणे, स्थानिक उद्योग, शेतकऱ्यांना ऊर्जा अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासासाठी सक्षम बनविण्यासाठी आणि इतर अनेक फायद्यांसह वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करेल. इथेनॉल कमी प्रदुषणकारी इंधन आहे. मोठ्या प्रमाणात शेतीयोग्य जमिनीची उपलब्धता, अन्नधान्य आणि अतिरिक्त ऊस, इथेनॉल उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि इथेनॉल मिश्रीत पेट्रोलसाठी ई २० एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक गरज आहे.

बीपीसीएलकडून ओएमसींसोबत १३१ LTOAs वर स्वाक्षरी
बीपीसीएलने ओएमसींसोबत १३१ एलटीओए (LTOAs) वर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये जवळपास इथेनॉलची कमतरता असलेल्या राज्यांत दरवर्षी ७५७ कोटी लिटर क्षमतेचे इथेनॉल प्लँट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बीपीसीएलने रेल्वेच्या माध्यमातून बहुतांश तोट्यात असलेल्या राज्यांत इथेनॉलची वाहतूक आणि तोट्यातील राज्यांत जादा मिश्रण करण्याची योजना तयार केली आहे. बीपीसीएल ओडिसामध्ये बरगढमध्ये एकीकृत २ जी आणि १ जी बायो इथेनॉल रिफायनरी स्थापन करीत आहे. बायो इथेनॉल रिफायनरीची क्षमता ६ कोटी लिटर प्रती वर्षापर्यंत वाढवली जाईल. बायोमासचा फिडस्टॉक म्हणून वापर केला जाईल. २ जी इथेनॉलच्या १०० केएलपीडी आणि फिडस्टॉकसाठी तांदळाचा वापर करून १०० केएलपीडी १ जी बायो इथेनॉल उत्पादन क्षमता आहे.

इथेनॉल साठवणूक सुविधाचे विस्तार
ई २० (२०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण) उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी बीपीसीएलने आपल्या सर्व डेपो, टर्मिनलमध्ये २० टक्के ब्लेंडिंग रोलआऊट २०२५ पर्यंतची अतिरिक्त गरज पूर्ण करण्यासाठी इथेनॉल साठवणूक सुविधेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपन्यांमध्ये सहभागी असलेली भारतातील पेट्रोलियममधील इंडियन ऑईल मार्केटिंग कंपनी आहे. भारतातील एकीकृत ऊर्जा कंपन्यांपैकी एक ही कंपनी कच्च्या तेलाचा शोध आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणात काम करते. ही कंपनी एलिट क्लबमध्ये सामिल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here