पंजाब: ऊस उत्पादक शेतकरी-प्रशासनातील बैठक निष्फळ

फगवाडा : फगवाडामध्ये लुधियाना-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर थकबाकी देण्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुरू झालेले धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. कपूरथलाचे उपायुक्त विशेष सारंगल आणि शेतकरी नेत्यांच्या दरम्यानची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ राहिली. BKU (Doaba) चे अध्यक्ष मनजीत सिंह राय यांनी याबाबत आंदोलनकर्त्यांसमोर घोषणा केली की, जोपर्यंत संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ७२ कोटी रुपये येत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवले जाईल.

यांदरम्यान, संधार साखर कारखान्याचे अध्यक्ष सुखबीर सिंह संधर यांनी युकेमधून एक व्हॉट्सअॅप कॉलवर शेतकऱ्यांना थकबाकी देण्याबाबत लालफितीचा अडथळा असल्याचा आरोप केला. पंजाबच्या सर्व २२ जिल्ह्यांतील आपली संपत्ती जप्त करण्याच्या डीसींच्या आदेशाबाबत टिप्पणी करताना संधर यांनी आपण किंवा आपल्या कुटुंबीयांनी गेल्या १० वर्षात जगातल्या कोणत्याही भागात काहीच संपत्ती खरेदी केलेली नाही असा दावा केला. ते म्हणाले की, जर सरकारला वाटले तर माझ्या सर्व बँक खात्यांची आणि इतर कागदपत्रांची तपासणी करावी. यासोबतच माझ्याकडून कोणत्याही बँकेमधून कोणत्याही प्रकारे परदेशात पैसे पाठवले गेलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here