हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
भोपाळ (मध्य प्रदेश) : चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. उसाची लावण, खत टाकणे आणि त्यावर फवारणी करणारे एकच मशीन आता उपलब्ध झाले आहे. त्यामुळे उसाची शेती आणखी सोपी होणार आहे. शुगर केन प्लांटर नावाचे हे मशीन आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
कृषि महाविद्यालयाचे संचालक राजीव चौधरी यांनी सांगितले की, नरसिंहपूर जिल्ह्यात पहिल्यांदा हे मशीन वापरात येणार आहे. मेरठ येथील खालसा कृषि महाविद्यालयातून हे मशीन मागवण्यात आले आहे. कृषि तज्ज्ञांच्या दाव्यानुसार या मशीनच्या साह्याने आठ तासांत अडीच एकर क्षेत्रात उसाची लावण होऊ शकते. त्यासाठी केवळ तीनच कामगारांची गरज लागणार आहे. तसेच ९२ क्विंटल उसाची बचतही होणार आहे. परिणामी शेती चांगली राहण्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच त्यामुळे उत्पादन वाढणार असून, कारण, या मशीनमधून केवळ चांगल्या उसाची लावण केली जाणार आहे. या मशीनची किंमत जवळपास दोन लाख रुपये आहे. त्यावर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना त्यावर ४० ते ५० टक्क्यांची सवलत आहे. मध्य प्रदेशचा विचार केला तर तर राज्यात एक लाख ४ हजार ४०० हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. यामध्ये नरसिंहपूर, छिंदवाडा, बुरहानपूर, बैतुल व दतिया या जिल्ह्यांत उसाचे सर्वाधिक उत्पादन होते.
कृषी तज्ज्ञांच्या दाव्यानुसार पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी प्रति हेक्टर जवळपास १०० क्विंटल ऊस लावण करतात. नव्या तंत्रज्ञानातून केवळ ८ क्विंटल ऊस लावण करण्यासाठी लागणार आहे. या तंत्रज्ञानातून केवळ ८ क्विंटल डोळेच लावण करण्यासाठी बाहेर काढले जातात. त्यामुळे उर्वरीत ऊस शेतकऱ्यांना कारखान्याला देता येणार आहे. या लावणीतून केवळ २० ते २५ दिवसांत उसाची रोपे तयार होऊ शकतात. हे मशीन ट्रॅक्टरच्या मागे लावायचे असून ट्रॅक्टर चालवणारा एक आणि दोघे मशीनवर असे तिघेच लावणीच्या कामासाठी लागणार आहेत. यापूर्वी पारंपरिक शेतीमध्ये लावणीसाठी दहा मजुरांची गरज होती. दरम्यान, लावण करण्यापूर्वी शेत जमीन व्यवस्थित तयार करून घ्यावी लागणार आहे.
मशीन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अडजेस्ट करता येणारे आहे. त्यामुळे उसामध्ये अंतरपिकही घेता येणे शक्य आहे. त्यामुळे शेतकरी उसाबरोबरच २० प्रकारची इतर पिके घेऊ शकतो.
पारंपरिक लावणीमध्ये उसाचा डोळा सोडला तर इतर ऊस वाया जात होता. आता डोळ्यासोबत गरजे इतकाच ऊस कापून घेतला जाणार असल्याने उर्वरीत ऊस कारखान्याला देता येणार आहे.
खंडवा : रायपूर येथील इंदिरा गांधी कृषि महाविद्यालयाने चांगल्या गुणवत्तेची टिश्यू कल्चर रोपे विकसित केली आहेत. यातून शेतकऱ्यांना उत्तम गुणवत्तेची रोगमुक्त रोपे देण्याचा उद्देश आहे. या वाणामध्ये साखरेची मात्रा जास्त असणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही जास्त होणार आहे. ही रोपे आठ रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहेत. या टिश्यू कल्चर रोपांमुळे शेतकरी आपल्या शेतात शुद्ध रोपण सामुग्री तयार करू शकतो. या संदर्भात कृषि प्रयोगशाळा तज्ज्ञ डॉ. एल. एस. वर्मा म्हणाले, ‘साधारणपणे शेतकरी उसाचे सेट तयार करून त्याची रोपण करतात. यात खूप मोठ्याप्रमाणावर ऊस वाया जातो. स्वतःच्याच शेतात आलेल्या उसाची पुन्हा लावण केल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते तसेच त्याचा उताराही कमी येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी रोपण सामुग्री बदलण्याची गरज आहे.’ इंदिरा गांधी कृषि महाविद्यालयाने विकसित केलेली ही रोपे रोग प्रतिबंधक असल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp