पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने गेल्या ७-८ वर्षांत देशाचे सुमारे ५०,००० कोटी परदेशात जाण्यापासून वाचले : पंतप्रधान

पानीपत :  जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २ जी इथेनॉल प्लांटचे लोकार्पण केले. देशात जैव इंधनाचे उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन आणखी बळकट करण्यासाठी हरियामातील पानीपतमध्ये हा प्लांट स्थापन करण्यात आला आहे.

हा प्लांट राष्ट्राला समर्पित करण्याचे हे पाऊस देशात जैव इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतून सरकारकडून उचललेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतील एक महत्त्वाचा भाग आहे. हा निर्णय म्हणजे ऊर्जा क्षेत्राला अधिक लाफदायक, सुलभ, कुशल आणि टिकाऊ बनविण्याच्या पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.

कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांना या खूप फायदा होईल. आधी शेतकऱ्यांसाठी पाचट हा मोठा अडसर होता. आता तो त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत बनला आहे. यासोबतच प्रदूषणातही घट होईल. निसर्गाचे पूजन करणाऱ्या आपल्या देशासाठी जैव इंधन हे निसर्गाच्या रक्षणासाठी महत्त्वाचे आहे. आमचे शेतकरी याला योग्य रित्या समजतात. आमच्यासाठी जैव इंधन म्हणजे पर्यावरण वाचविणारे हरित इंधन आहे. ते म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे गेल्या ७-८ वर्षात देशाचे जवळपास ५०,००० कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचले आहेत. आता त्याच पैशांचा उपयोग देशातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केला जात आहे.

या २ जी इथेनॉल प्लांटची उभारणी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (आयसीसीएल) ९०० कोटी रुपयांहून अधिक खर्चून करण्यात आली आहे. पानीपत रिफायनरीच्या जवळच हा प्लांट आहे. अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा प्लांट जवळपास तीन कोटी लिटरचे उत्पादन करण्यासाठी वार्षिक जवळपास दोन लाख टन तांदूळाचा भुस्सा (पराली) वापरुन चालवला जातो. कचऱ्यापासून पैसे निर्मिती करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक नवा अध्याय सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here