श्रावस्ती : सिरसियामधील रामपूर देवमन गावातील प्रगतशील शेतकरी अनंतराम वर्मा यांच्या शेतात तुलसीपूर साखर कारखाना, बलरामपूरचे उप महाव्यवस्थापक डॉ. राजेश प्रताप शाही यांनी फीत कापून मान्सून काळातील ऊस लागवडीचा प्रारंभ केला. मान्सून काळातील ऊस लागवडीमुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नशीब उजाडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
उप महाव्यवस्थापक म्हणाले की, सिरसियामधील जमीन चांगली आहे. शेतकऱ्यांनी नव्या प्रजातीच्या ऊसाची शास्त्रीय पद्धतीने लागवड करावी. रोपांतील किमान अंतर तीन फुटांचे असावे. शेतकऱ्यांनी बटाटा-ऊस, ऊस-मिरची, टोमॅटो-ऊस, फ्लॉवर-ऊस, लसूण – ऊस, कांदा-ऊस तसेच डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घ्यावे.
जागरणमधील वृत्तानुसार, सहाय्यक व्यवस्थापक शशांक राय म्हणाले की, ऊसासाठी दीर्घ कालावधी लागतो. त्यासाठी २७-३३ डिग्री सेंटीग्रेड हे तापमान उपयुक्त आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी उसाच्या वाढीसाठी अतिशय चांगला आहे. या वेळेत ऊस कठिण परिस्थितीतही तग धरतो. शेतकऱ्यांना अनुदानावर औषध पंप, डिझेल इंजिन, जंगली जनावरांपासून पिकांच्या बचावासाठी सोलर पॅनल दिले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा. यावेळी सीडीओ अभय श्रीवास्तव, शेतकरी रणवीर बहादुर यादव, संतोष वर्मा, अरविंद वर्मा, अशर्फीलाल वर्मा, शिव कुमार, नंदूराम, सुनील आदी उपस्थित होते.