भारताच्या माल आणि सेवा निर्यातीत जुलैमध्ये वार्षिक ११.५१ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : भारतात माल आणि सेवा निर्यातीत जुलै २०२२ मध्ये वार्षिक आधारावर ११.५१ टक्के वाढ झाली असून ही निर्यात ६१.१८ अब्ज डॉलर होईल असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याच कालावधीत एकूण आयात ८२.२२ अब्ज डॉलर झाल्याचे अनुमान आहे. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही आयात ४२.९० टक्के इतकी आहे. तंबाखू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कॉफी, तांदूळ, धान अशा सेक्टर्स आणि प्रक्रियाकृत वस्तूंच्या बाबत चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे भारतात व्यापारी निर्यात जुलै २०२२ मध्ये वार्षिक आधारावर २.१४ टक्क्यांनी वाढली आहे. ही निर्यात ३६.२७ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही निर्यात ३५.५१ अब्ज डॉलर होती.

मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, जुलै २०२२ मध्ये देशातील व्यापारी अथवा मालाची आयात वाढून ६६.२७ अब्ज डॉलर झाली आहे. जुलै २०२१ मध्ये ही आकडेवारी ४६.१५ अब्ज डॉलर होती. चांदीच्या वस्तू, गुड्स, कॉटन रॉ अँड वेस्ट, कोळसा, कोल ब्रिकेट्स, टेक्स्टाइल, यार्न फॅब्रिक, मेक अप आर्टिकल्स याच्या आयातीत वाढ झाली आहे. याशिवाय सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै २०२२ मध्ये एकूण निर्यात २५३.८४ अब्ज डॉलर झाल्याचे अनुमान आहे. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही निर्यात २२.८५ टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे एकूण आयात ३१७.४० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही आयात ४७.६८ टक्के अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here