पंजाब : थकबाकी देण्याची साखर कारखाना कामगारांची मागणी

फाजिल्का : साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची भेट घेऊन आपली थकीत असलेली रक्कम जारी करण्याची मागणी केली.

फाजिल्का केंद्रीय सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी वेद प्रकाश आणि लाल चंद यांनी सांगितले की, २०२० मध्ये ७५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कालावधीत १० जणांचा मृत्यूही झाला आहे. मात्र त्यांच्या निवृत्तीनंतरची रक्कम थकीत आहे. ते म्हमाले की, लवकरात लवकर पैसे दिले जातील असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सरकारने आतापर्यंत आपले आश्वासन पाळलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून पगार मिळाला नसल्याने कारखान्याचे २२७ कर्मचारी नाराज आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here