कीव : युक्रेनमधील युद्ध आणि गॅसच्या उच्च किमतीमुळे एक तृतीयांश रिफायनरी आगामी साखर हंगामात काम करू शकणार नाहीत, असे Ukrtsukor ने म्हटले आहे. सोव्हीएट काळात युक्रेनमध्ये ५ मिलियन टन बीट साखरेचे उत्पादन केले जात होते. मात्र, कमी झालेली मागणी, इंधनाची वाढती किंमत आणि उसापासून निर्मित साखरेची स्वस्त निर्यात, बाजारातील स्पर्धा यामुळे उत्पादन १ मिलियन टनापर्यंत घसरले आहे. युरोपीय गॅसचे दर २,००० डॉलर प्रती १,००० क्युबिक मिटरपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ३२ पैकी १० साखरेच्या रिफायनरी एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात चालू होणार नाहीत, हे यामागील मुख्य कारण आहे.
युक्रेनच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व क्षेत्रातील लढाईमुळे बीट आणि इतर प्रमुख पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. आणि २०२१ मध्ये उच्चांकी ८६ मिलियन धान्याचे पीक जवळपास ५० मिलियन टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. याबाबत कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी यावर्षी १,८०,४०० हेक्टरमध्ये बीटची लागवड केली आहे. त्यापैकी ७.८३ मिलियन टन बीटपासून १.०८ मिलियन टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
कृषी मंत्रालयाने सांगितले की, एक सप्टेंबर २०२२-२३ च्या साखर उत्पादन हंगामाच्या सुरुवातील युक्रेनकडे जवळपास ४,७०,००० टन साखर साठा असेल. आणि यातील अपेक्षित उत्पादन, स्थानिक गरजा आणि निर्यात या दोन्ही गोष्टींची पूर्तता करू शकेल.