ऊस मंत्र्यांसमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या

रामगढवा : रामगढवा विभागाचे राजदचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्याचे ऊस मंत्री तथा नरकटियाचे आमदार डॉ. शमीम अहमद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कार्यकर्त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यांचे निराकरण त्वरीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत युवा राजदचे अध्यक्ष मुकेश यादव यांनी सांगितले की, विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि संघटनेच्या मजबुतीबाबत कार्यकर्त्यांसह मंत्र्यांची खैरवा येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्र्यांनी राजदच्या कार्यकर्त्यांना लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी राजदचे राज्याध्यक्ष हाजी मूसा, सरपंच हाजी नसीबुल हक, एजाज अहमद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here