मधुबनी : मिथिलातील औद्योगिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या मधुबनीतील लोहट साखर कारखान्याच्या परिसरात आगामी महिन्यात दोन इथेनॉल उत्पादन युनिट सुरू केले जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री समीर कुमार महासेठ यांनी केली. तसेच सकरी व रैयाम साखर कारखाना सुरू करण्याच्या शक्यता पडताळणीसाठी बिहार सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दोन इथेनॉल उत्पादन युनिट सुरू झाल्यानंतर मधुबनीसह मिथिलामधील दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इथेनॉल युनिट सुरू झाल्यास शेकडो उद्योगांना कृषी आधारित लघू उद्योगातून रोजगाराच्या संधी मिळतील. शेतकरी खुश होतील. तसेच बिहारला आत्मनिर्भर बनविण्यात आपल्याला यशस्वी होता येईल असे उद्योग मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, होलट साखर कारखाना परिसरात ८०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीपासून दोन इथेनॉल उत्पादन सुरू झाल्यानंतर प्रती दिन ५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन होईल. त्यासाठी दररोज २६० टनाहून अधिक मक्का, तांदूळ आणि उसाची गरज भासेल. याशिवाय पशू आहार व पोल्ट्री आहाराचे उत्पादन होईल. इथेनॉल उत्पादन युनिटद्वारे शेतकऱ्यांना भात, गहू या पिकादरम्यान, मक्का उत्पादन करण्याचे प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जाईल असे मंत्री म्हणाले. लोहट साखर कारखान्याची स्थापना १९१४ मध्ये दरभंगा शुगर कंपनीअंतर्गत करण्यात आली होती, अशी माहितीही उद्योग मंत्री समीर कुमार महासेठ यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण राय, निर्मल राय, सुनील नायक, पप्पू सिंह, कप्पू सिंह, वीरेंद्र सिंह, गणेश सिंह आदींनी केले होते. माजी आमदार रामकुमार यादव, सीताराम यादव, रामावतार पासवान, उदय जायसवाल, सुनील नायक उपस्थित होते.