भारतातील ५० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विजय निरानी यांच्या नावाचा समावेश

नवी दिल्ली : एलीट मॅगझीन इंडियातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून देशात परिवर्तन करणाऱ्या, ग्रोथ हॅकर्स आणि देशाच्या विकासाचे नेतृ्त्व करणाऱ्या ५० सर्वाधिक प्रभावशाली भारतीय व्यक्तींची निवड करण्यात येते. भारतातील विविध क्षेत्रात नवे मानदंड सथापन करून देशाच्या लोकांचे जीवन उंचावण्यात आणि देशात विकास तसेच समृद्धीचा माहौल तयार करण्यात या ५० व्यक्ती यशस्वी ठरल्या आहेत अशांचा यात समावेश असतो. या वर्षीही इलिट मॅगझीन इंडियाने टॉप ५० भारतीयांची यादी जारी केली आहे. त्यामध्ये भारताला अधिक प्रगतीपथावर नेणाऱ्यांचा समावेश आहे. या टॉप ५० भारतीयांमध्ये एमआरएन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विजय निरानी यांच्याही नावाचा समावेश आहे.

एमआरएन समूह आशियातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आहे, जो प्रती दिन २.५ मिलियन लिटरपेक्षा अधिक इथेनॉलचे उत्पादन करतो. आणि भारतातील द्वितीय क्रमांकाचा साखरेचा मोठा उत्पादकही आहे. समुहाने ७०,००० हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे आणि १.५ लाखाहून अधिक शेतकरी कुटूंबे थेट त्यांच्यावर अवलंबून आहेत. एमआरएन समूह भारतातील प्रमुख व्यापारी समुहापैकी एक आहे, ज्यामध्ये साखर उत्पादन, इथेनॉल, नवऊर्जा, बँकिंग, सिमेंट, एलएनजी, सीएनजी, किरकोळ, शिक्षण, खते आणि कृषी उत्पादने, सीओ २, गारमेंटसोबत २१ हून अधिक विविध कंपन्यांचा समावेश आहे. एलिट मॅगझीनद्वारे भारतातील सर्वात प्रभावशाली यादी २०२२ मध्ये सद्गुरु जी, रजत शर्मा, विजय निरानी, करण जोहर, सोनू सूद, अनन्या बिर्ला, मसाबा गुप्त आणि इतर अनेक लोकांचा समावेश आहे, जे राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

विजय निरानी एका अशा भारताच्या निर्मितीसाठी अग्रेसर आहेत, जेथे अक्षय्य ऊर्जा आणि स्थिरता महत्त्वाची आहे. जगभरातील लोक स्थायी ऊर्जा, सातत्यपूर्ण विकास, जीवनशैली आणि आपल्या पृथ्वीला स्वच्छ आणि हरित करण्याचा विचार करतात, तर विजय निरानी हे एक असे व्यक्ती आहेत की, ज्यांनी पूर्ण क्षेत्रामध्ये क्रांती आणली आहे. आज, विजय निरानी यांच्या अध्यक्षतेखालील एमआरएन समूह जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, स्वच्छ आणि हरीत ऊर्जा प्रदान करणे आणि स्थायी भविष्य बनविण्यासाठी ऊसाचा वापर करीत आहे. ५० सर्वाधिक प्रभावशाली भारतीयांना सन्मानीत करण्यासाठी टॉवर ऑफ लंडन ब्रिजवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आणि औद्योगिक क्षेत्रातील नेत्याची उपस्थिती होती. आम्ही आगामी काळात एमआरएन समूह आणि विजय निरानी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भव्य प्रगतीची प्रतीक्षा करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here