पाटणा : गुंतवणूकदारांना बिहारचे इथेनॉल क्षेत्र आकर्षित करीत आहे. गेल्या चार-पाच वर्षात या क्षेत्रातून सर्वाधिक प्रस्ताव आले आहेत. याशिवाय सर्वाधिक मंजुरी इथेनॉल प्लांटला मिळाली आहे. या कालावधीत इथेनॉल क्षेत्रात ३२,४५४ कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजूरी दिली गेली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १५९ युनिटला मान्यता मिळाली आहे. ही आकडेवारी बिहारमधील एकूण गुंतवणूकीच्या ५७ टक्के आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा चेहरा इथेनॉल उत्पादन क्षेत्राच्या रुपात बदलू शकतो. या क्षेत्रामधून हजारो लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्य सरकारने यादरम्यान, ५७,०६९.४१ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दर्शविला आहे. या अंतर्गत अन्नधान्य प्रक्रिया, इथेनॉल, नवऊर्जेच्या प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या युनिटवर दृष्टिक्षेप टाकला तर आताही बिहारच्या औद्योगिक क्षेत्रावर अन्नधान्य प्रक्रिया क्षेत्राचे वर्चस्व आहे. चालू युनिटमध्ये गुंतवलेल्या २४३८.६३ कोटी रुपयांपैकी ९७८.७२ कोटी रुपये याच क्षेत्रात आले आहे. हे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के आहे. याशिवाय सिमेंट कंपन्यांमध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.