आजमगढ : सठियांव येथील दि किसान सहकारी साखर कारखान्यात सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात त्रुटी दर्शवून त्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. जिल्हा ऊस अधिकारी लाल यांना यावेळी मुख्य अभियंत्यांनी देखभाल, दुरुस्तीच्या कामाबाबत विभागनिहाय माहिती दिली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्य अभियंत्यांनी सांगितले की, कारखान्याच्या मुख्य ठिकाणाचे काम ४१ टक्के पूर्ण झाले आहे. बॉयलर हाऊसचे काम ४० टक्के आणि सेंट्रीफ्युगल मशीनचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण ४० टक्के दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, निर्धारीत वेळेत देखभाल, दुरुस्तीच्या कामांची पूर्तता करावी असे निर्देश जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांना दिले. यावेळी मुख्य ऊस अधिकारी त्रिलोकी सिंह, मुख्य अभियंता मायाराम यादव, विनोद कुमार यादव आदी उपस्थित होते.