साओ पाउलो : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्राझीलच्या उद्योग जगतामधील संघटनेसोबत (LIDE) यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले की, भारत आणि ब्राझील हे केवळ भागीदार नसून दोघांच्याही परस्पर विकास आणि प्रगतीसाठी आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात आहोत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी साओ पाउलो राज्यातील उद्योग संघाचाही दौरा केला. मजबूत द्विपक्षीय संबंधादरम्यान व्यापार सहयोगामध्ये दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या अनेक संधी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २२-२७ ऑगस्टपर्यंत ब्राझील, पराग्वे आणि अर्जेंटिना येथील अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या या दोऱ्यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांसह द्विपक्षीय संबंधांसह, तिन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आपल्या यात्रेदरम्यान, जयशंकर यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियातील देशांच्या राजदुतांशी चर्चा केली होती. मंत्री जयशंकर यांनी एलएसी देशांच्या राजदुतांच्या आदरातिथ्याबाबत आभार व्यक्त केले. भारत आणि दक्षिण अमेरिका, कॅरेबियन देशांदरम्यान वाढत्या सहयोगाच्या क्षमतेबाबत सकारात्मक समाधान व्यक्त केले. आणि त्यांच्या दृष्टिकोनाबाबत राजदुतांना धन्यवाद दिले.