जीएसटी संकलन वाढूनही राज्यांची महसुली वाढ घटणार, ७-९ टक्क्यांपर्यंतच राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : जीएसटीचे संकलन चांगले होत असूनही चालू आर्थिक वर्षात राज्यांतील महसूलाची वाढ सात ते नऊ टक्क्यांदरम्यान राहील अशी शक्यता आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीच्या रिपोर्टमध्ये याची स्पष्टता झाली आहे. देशाच्या जीडीपीत ९० टक्के योगदान असलेल्या १७ राज्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, केंद्रीय करात राज्यांचा हिस्सा चालू आर्थिक वर्षात वाढू शकतो. त्याचा परिणाम म्हणून राज्यांची महसुली वाढ कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण जीएसटी संकलनात चांगली वाढ होईल.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जीएसटी संकलन याबाबतच्या अहवालात म्हटले आहे की २०२०-२१ मधील कोरोना महामारीच्या प्रकोपादरम्यान महसूली वाढ कमी होती. त्या तुलनेत २०२१-२२ मध्ये २५ टक्के अधिक वाढ दिसून येत आहे. क्रिसिलने म्हटले आहे की आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कर वसुली चांगली राहिल्याने महसुली वाढीस बळ मिळेल. राज्यांना मिळणाऱ्या महसुलात ४५ टक्के हिस्सा जीएसटी कलेक्शन आणि केंद्राकडून वितरण करून दिला जातो. यामध्ये १० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here