उत्तर प्रदेश: सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहकारी साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची थकीत बिले आता लवकर मिळू शकतील. सरकारने ऊस उद्योगाच्या मजबुतीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. सहकारी कारखान्यांकडून आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५२४.९० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. ऊस थकबाकी देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी क्षेत्रातील ३ साखर कारखान्यांना २०२१-२२ या गळीत हंगामासाठी १०० टक्के ऊस दर हमी दिली आहे. याचा लाभ राज्यातील ३,६८,५४५ ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना होणार आहे. उत्तर प्रदेशातील सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस दर देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून साखर उद्योग सुदृढ करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कारखान्यांचा क्षमता विस्तार करून इथेनॉल उत्पादनासाठी आसवनी स्थापन केली जात आहे. सरकारने राज्यातील २४ सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिले दिली जातील याची काळजी घेतली आहे, असे भुसरेड्डी यांनी सांगितले. उत्पादनांच्या विक्रीमधून मिळालेल्या पैशातून २०२१-२२ या हंगामात खरेदी केलेल्या ऊसापोटी २५२४.९० कोटी रुपये थेट उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here