श्रीराम साखर कारखाना सप्टेंबरमध्ये सुरू करणार ऊस गाळप

चुनचनकट्टे : राज्य सरकारच्या मदतीने चालणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच आपले कामकाज सुरू करणार आहे. श्रीराम साखर कारखान्याने दहा वर्षांपूर्वी आपले कामकाज बंद केले होते. कारखाना भाडे तत्त्वावर देवून चालविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, कारखाना लीजवर घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. आमदार एस. आर. महेश यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि राज्य सरकारवर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदनांतून दबाव आणला. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत पुन्हा निविदा प्रक्रिया केली. आणि आता निरानी शुगर्सने कारखाना सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रसार माध्यमातील रिपोर्टनुसार, निरानी शुगर्सने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. खराब मशीनरी दूर केली जात असून इतरांची दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याचे टर्बाइन दुरुस्तीसाठी हैदराबादला पाठविण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण होत आल्याने आगामी ३-४ दिवसांत टर्बाइन परत आणले जाईल अशी शक्यता आहे. टर्बाइन बसवणे, बॉयलर दुरुस्तीनंतर कारखाना ऊस गाळपास सज्ज होईल. कारखान्याची सध्याची गाळप क्षमता २००० टन प्रती दिन असून ती वाढवून २५०० टन प्रती दिन करण्याची योजना आहे. ऊसाची उपलब्धताही होवू शकते. के. आर. नगर, पेरियापटना, हुनसूर आणि एच. डी. कोटेमध्ये जवळपास ४००० ते ५००० एकरात ऊस लागवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here