तामिळनाडू :ऊस गाळप लवकर सुरू करणाची शेतकऱ्यांची मागणी

धर्मपुरी : धर्मपुरी जिल्ह्यात कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने ऊस गाळप नेहमीपेक्षा लवकर सुरू करण्याची मागणी Subramaniya Siva Cooperative Sugar mill (SSCS) शी संलग्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. SSCS जिल्ह्यातील दोन सरकारी साखर कारखान्यापैकी एक आहे. या कारखान्याशी ४०,३५० शेतकरी जोडले गेलेले आहेत. आतापर्यंत १०,५०० एकरातील ऊसाची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात कामगारांचा तुटवडा असल्याने तोडणी आणि वाहतुकीसाठीचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच गाळप सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यावर आपले मतप्रदर्शन करताना, ऑल शुगरकेन कल्टिवेटर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष एस. के. अण्णादुरई यांनी सांगितले की, खरेतर नेहमी SSCS कारखाना डिसेंबरच्या अखेरीस सुरू केला जातो. या कालावधीत कुशल कामगारांची मागणी जास्त असते. एक एकर ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना १२,००० रुपयांचा खर्च करावा लागतो. तर लावण, किटकनाशके, शेतीची इतर कामे यासह एकूण खर्च ३०,००० रुपये प्रती एकरवर पोहोचतो. शेतकऱ्यांना मिळालेल्या नफ्यातील ३० टक्के पैसे कामगारांवर खर्च होतात. त्यामुळे अण्णादुरई यांनी ऊस दर ४,००० रुपये प्रती टन करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here